राजापूर न.प.च्या पाणी पुरवठा करणार्या लाईनमध्ये आढळला मृत साप? नगर परिषदेचा काडवी मासा असल्याचा खुलासा
राजापूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा करणार्या जलवाहिनीमध्ये कुजलेला साप आढळल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र न.प. प्रशासनाने तो साप नसून काडवी नामक मासा असल्याचे म्हटले आहे. गेले काही दिवस राजापूर शहरवासियांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. यावेळी नागरिकांनी काही पाईपलाईनची खोदाई केली असता त्या ठिकाणी कुजलेला साप आढळून आला होता.
www.konkantoday.com