
चिपळूणची अभिनेत्री साक्षी गांधी आता अल्टी पल्टी सुमडीत कल्टी मालिकेत
झी मराठी वाहिनीवर बुधवार व शनिवार रात्रौ १० वा. प्रसारित होणार्या अल्टी पल्टी सुमडीत कल्टी मालिकेत चिपळूणची साक्षी महेश गांधी दिसणार आहे. साक्षीने या मालिकेत मनाली नावाची भूमिका साकारली आहे. मन उधाण वारा, हिरकणी आदी सिनेमांमध्ये साक्षीने काम केले आहे वेबसिरीजमध्येही तिने काम केले आहे. आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमधून तिने अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत.
www.konkantoday.com