
आंतरमहाविद्यालयीन धनुर्विदा अजिंक्य स्पर्धेत झोरे स्पोर्टस ऍकॅडमीच्या कृष्णा मोरे याला ब्रांझ पदक
बिर्ला कॉलेज कल्याण येथे आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या अजिंक्य स्पर्धेत रत्नागिरीच्या झोरे स्पोर्टस ऍण्ड ऍकॅडमीच्या कृष्णा मोरे याने चमकदार कामगिरी केली. कृष्णा मोरे याने रिकर्व्ह प्रकारात ब्रांझ पदक पटकावले त्याच्या या कामगिरीमुळे त्याची अखिल भारतीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. कृष्णा हा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथमवर्ष एम.एस्सी.मध्ये शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.
www.konkantoday.com