महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरीत १६ डिसेंबरपासून कमी दाबाने पाणी पुरवठा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हरचेरी येथील विहिरीतील गाळ उपसण्याचे काम १६ ते ३० डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरीतील मिरकरवाडा, परटवणे, मिर्या, भगवती बंदर आदी परिसरामध्ये पहाटे ३.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार आहे. उद्यमनगर, झाडगांव औद्योगिक क्षेत्र, फिनोलेक्स कॉलनी या परिसरामध्ये सकाळी ७ ते ८.३० पर्यंत पाणी पुरवठा होणार आहे. कुवारबांव, नाचणे, पोमेंडी, साळवी स्टॉप या ठिकाणी दुपारी १.३० ते ७ पर्यंत पाणी पुरवठा होणार आहे. मिरजोळे औद्योगिक वसाहत, पाटबंधारे येथे सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार आहे.
www.konkantoday.com