अवैधपणे वाळू वाहतूक करणारे २ डंपर पकडले
लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई करूनही चिपळूण तालुक्यात वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. येथील महसूल विभागाच्या पथकाने चार दिवसांत विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले असून त्यांना सुमारे साडेतीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, वाळू चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने अधिकार्यांसमोर मोठे आव्हान उभेग ठाकले आहे.
www.konkantoday.com