देवरुख येथील ब्राह्मण हितवर्धिनीबिगरशेती सहकारी संस्थेची ,फसवणूक एकाविरुध्द गुन्हा दाखल

देवरुख येथील ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्थेची फसवणुक केल्याप्रकरणी मुंबई – डोंबिवली येथील राणे होम्स बिल्डर्सवर देवरुख पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जयसिंग राणे असे त्या बिल्डर्सचे नाव आहे . १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची ठकवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे .
देवरुख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार याबाबतची फिर्याद ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा देवरुखचे शाखाधिकारी जयेश विलास जोशी यांनी दिली आहे . या फिर्यादीमध्ये आरोपी जयसिंग गोपाळराव राणे , प्रोप्रा.राणे होम्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स यांच्या विरोधात १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची ठकवणूक केल्याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . जयसिंग राणे यांनी ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्था शाखा देवरुखमध्ये जात आपण राणे होम्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स असल्याचे सांगत विश्वास संपादन केला व पतसंस्थेकडे नविन वाहन तारण कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी १५ लाख रुपये कर्जा करिता संस्थेला आवश्यक असणारी कागदपत्रे ( दस्तऐवज ) खोटी व बनावट तयार करुन ती खरी आहेत असे भासवले आणि ती कागदपत्रे कर्ज मंजूरी करीता पतसंस्थेमध्ये जमा करुन कर्ज मंजूर करुन घेतले . त्या कर्जाच्या नियमाप्रमाणे आजपर्यंत १७ लाख ६५ हजार ३०२ रुपये व्याजासह परफेड न करता ठकवणूक केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे . तसेच संस्थेकडून मंजूर झालेल्या कर्जामधून खरेदी केलेल्या वाहन तारण वाहनाची रजिस्ट्रेशन कागदपत्रे जमा केलेली नाहीत , याबरोबरच गाडीचे हप्ते संस्थेमध्ये गाडी घेतल्यापासून आजपर्यंत जमा केलेले नसल्याने फिर्यादीत म्हटले आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button