सायबर गुन्हे रोखण्यासाठी एटीएम वापराबाबतचे नियम बदलणार
सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध बँकांचे एटीएम बदलाचे नियम बदलणार आहेत. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली ३१ डिसेंबरला जारी होणार आहे.
त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील असं सांगितले आहे. एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे ऍप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत, त्याद्वारे सातत्याने निगराणी राखावी. सोबतच शॉपिंगसाठी नव्या कार्डसोबतच आरबीआयने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट लॉंच करण्याची घोषणाही केली आहे. याचा वापर १० हजार रुपयांपर्यंतचं सामान किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करता येईल. याबाबत अधिक माहिती ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दिली जाणार आहे.
www.konkantoday.com