चित्रकार माचिवले ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये
निसर्गाच्या सुंदर रंगसंगतीतून घेतलेल्या प्रेरणेने आपल्या कुंचल्यातून कॅनव्हासवर हुबेहुब चित्र साकारणारे रत्नागिरीतील तरवळ गावचे सुपुत्र अर्जुन धाकू माचिवलेनी आणखी एका मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. नुकताच मुंबई येथे त्यांना जगातील सर्वात वेगवान इन्स्टंट पोर्टेट आर्टिस्ट हा बहुमान आणि महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी एका तासात साकारलेल्या चित्राला संस्करण २०२० च्या ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.
सुमारे २२ वर्षापासून अर्जुन माचिवले यांनी कलेची साधना स्विकारलेली आहे. कलाशिक्षक म्हणून ते जरी मुंबईत असले तरी त्यांचे येथील गावाच्या मातीशी नाते आजही घट्ट आहे
www.konkantoday.com