रत्नागिरीतल्या सायक्लोथॉनला चांगला प्रतिसाद लहानांपासून मोठ्यांचा सहभाग
रत्नागिरीतल्या वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱया सायक्लोथॉन ला मोठा चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकजण मोठ्या उत्साहाने सायकल सह सहभागी झाले होते रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सायकल क्लबचे अध्यक्ष डॉ.नीलेश शिंदे डॉ.ताेरल शिंदे , निशी पोंक्षे आधी जण उपस्थित होते
रत्नागिरीच्या सायकल क्लबने रत्नागिरीकरांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली प्रदूषणमुक्त रत्नागिरी करण्यासाठी एक दिवस सायकलवरून हा उपक्रम राबविण्यात येतो त्याला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद लाभत आहे या रॅलीचा मारूती मंदिर जयस्तंभ आठवडा बाजार भगवती बंदर मिरकरवाडा भारती शिपयार्ड आणि तेथून परत असा मार्ग होता ही रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी ठिकठिकाणी पत्रकार संघासह अन्य सामाजिक संस्थांनी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलि होती याशिवाय स्पर्धकांना काही अडचण आल्यास त्यांच्या मदतीसाठी वाहनही तयार ठेवणेत आले होते.या रॅलीच्या मार्गावर वाहतूक पोलीस व पोलिसांनी अतिशय चांगल्या रीतीने बंदोबस्त ठेवला होता .
www.konkantoday.com