
रत्नागिरी शहरात आत्महत्येचे दोन प्रकार
रत्नागिरी शहरात आत्महत्येचे दोन प्रकार घडले आहेत शहरातील कर्ला भागात राहणार्या शमशाद शौकत मुकादम (५५) या घरात एकट्याच राहत होत्या त्यांनी अज्ञात कारणातून घराच्या सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली
रत्नागिरी शहरातील खालची आळी येथील लघु उद्योग वसाहतीत रान वाढलेल्या ठिकाणी जीतेंद्र तुकाराम खाके या इसमाने अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या शिगेला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली तो गवंडी काम करण्याचा व्यवसाय करत होता त्याच्या आत्महत्येचे कारण कळलेले नाही
www.konkantoday.com