शिवसेनेचा प्रभागनिहाय प्रचाराला जोरदार सुरूवात

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. प्रभागनिहाय प्रचाराला जोरदार सुरूवात केली. विशेष म्हणजे या प्रचारात आमदार उदय सामंत यांच्यासह पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांचा हिरीरीने सहभाग दिसत आहे. सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याने निवडणूक रंगतदार होणार हे निश्‍चित आहे.
सुरूवातीला युती म्हणून शिवसेना-भाजप या निवडणुकीकडे पाहत होते. सत्ता स्थापनेवरून युतीमध्ये काडीमोड झाला आणि स्थानिक पातळीवरील सर्व समीकरणे बदलली. शिवसेनेने पोटनिवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. आता प्रत्यक्षात त्यांनी प्रभागनिहाय प्रचार सभा सुरू केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button