
शिकारीला गेला असतांना बंदुकीची गोळी लागल्याने झाला तरुणाचा मृत्यू
गुहागर तालुक्यातील देवघर येथे मित्रांसोबत जंगलात शिकारीसाठी गेलेल्या मार्ग तामणे येथील सिद्धेश गुरव या तरुणाला सिंगल बॅरल बोअरच्या बंदुकीची गोळी लागून त्याचा मृत्यू झाला हा प्रकार बुधवारी घडला होता कॉलेजमध्ये शिकणारा तरुण आपल्या मित्रांसोबत देवघर येथील जंगलात शिकारीसाठी गेला होता अज्ञात दूरध्वनीवरून पोलिसांना तेथे मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती मृतदेहाजवळ बंदूक सापडली त्यामुळे प्राण्याची शिकार करताना बंदुकीचे चुकून सुटलेल्या गोळीने त्याचा बळी घेतला असा अंदाज आहे त्याच्यासोबत शिकारीसाठी गेलेल्या तीन मित्रांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
www.konkantoday.com