
मुंबईचे महत्व वाढविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरसावले,मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणार
देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने बँकॉक येथील सिऍम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ऍक्वेरिअम (मत्स्यालय उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांना दिल्या. मत्स्यालयासाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
www.konkantoday.com