
दिव्यांगांचे प्रश्न सोडवावेत यासाठी दिव्यांगांचे आंदोलन
दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसात जिल्हा परिषदेत एकत्रित बैठक घेवून त्यात विशेष समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी दिले. यावेळी दिव्यांगांतर्गे विशेष समस्या त्यांच्यापुढे मांडण्यात आल्या. अपंगांची होणारी परवड प्रशसनापुढे मांडण्यासाठी जागतिक अपंग दिन (३ डिसेंबर) संघटनेतर्फे जिल्हा परिषदेपुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, बांधकाम सभापती विनोद झगडे, समाजकल्याण अधिकारी डॉ. पुजारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी समन्वय समितीतर्फे आनंद त्रिपाठी, विजय कदम, अशोक भुस्कुटे, गौतम सावंत, विलास मोरे यांनी दिव्यांगांना येणार्या अडचणींची माहिती अध्यक्षांपुढे मांडली.
www.konkantoday.com