
पोलिस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की करणार्याला अटक
गणपती उत्सवासाठी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून देविदास हजबन याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील आठवडा
बाजार येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक चालली असता आरोपी देविदास याने ढोलपथकातील मुलां मुलींना अडथळा केला तेथे बंदोबस्तासाठी असलेले जयवंत बगल या हेडकॉन्स्टेबलनी देवदास याला समज देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने पोलिसांना शिवीगाळ करून तेथे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली.
www.konkantoday.com