शासनाने पुढाकार घेऊन संविधान साक्षारता अभियान राबविल्यास लोकशाही मजबूत होईल-सुहास खंडागळे
70 वर्षातील सर्वच सत्ताधाऱ्यांनी संविधान लागू झाल्या पासून देशातील सामान्य जनतेला ते समजू दिले नाही,लोकांपर्यंत संविधान पोहचवले नाही, शासनाच्या विधि विभागाने यापुढे प्रौढ़ साक्षरता अभियान प्रमाणे आता संविधान साक्षरता अभियान गावागावात व शहरी भागा मध्ये राबाववे अशी भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी देवरुख येथे आयोजित लोकशाही मेळाव्यात मांडली.
गाव विकास समिति रत्नागिरी जिल्हा या संघटने मार्फत देवरुख येथे संविधान दीना निमित्ताने दूसरा लोकशाही मेळावा आयोजित करण्यात आला होता.
देवरुख येथील छत्रपति शिवाजी महाराज चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह मध्ये आयोजित या कार्यक्रमाला लोकशाही प्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी बोलताना गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मागील 70 वर्षातील सर्वच सरकारांवर जोरदार हल्ला चढ़वत सर्वच सत्ताधारी यांनी संविधान लागू झाल्या पासून देशातील सामान्य जनतेला ते समजू दिले नाही,लोकांपर्यंत संविधान पोहचवले नाही असा आरोप करत शासनाच्या विधि विभागाने प्रौढ़ साक्षरता अभियान प्रमाणे आता संविधान साक्षरता अभियान गावगावत व शहरी भागा मध्ये राबाववे अशी गाव विकास समितिची भूमिका असल्याचे यावेळी म्हटले.संविधान लोकांना माहित झाल्यास देशात लोकशाही मजबूत होईल आणि आता जे गलिच्छ राजकरन जे होत आहे ते होणार नाही असे सुहास खंडागळे म्हणाले. देशात खऱ्या अर्थाने लोकशाही नाही,जेथे आमदार आणि मतदार ही विकत घेण्याच्या गोष्टी होतात,निवडणुकांत वारेमाप पैशांचा वापर होतो तिथे लोकशाही पूर्णतः रुजली आहे असे म्हणता येणार नाही असे स्पष्ट मत सुहास खंडागळे यांनी मांडले. सामान्य माणसाला लोकशाहीतील हक्क अधिकार माहिती होउ दिले जात नसल्याने सामान्य माणसाच्या विकास होत नाही असेही खंडागळे म्हणाले.देशातील सर्व नागरिकांना संविधान माहित झाल्यास लबाड़ी करणारे हद्दपार होतील,चांगले लोक राजकरण वाइट आहे असे म्हणतात आणि त्यामुळेच वाईट लोक राजकारणात आणि सत्तेत जाऊन बसतात,परिणामी बदल हवा असणाऱ्या सुजाण लोकांनी एकत्र यायला हवे असेही सुहास खंडागळे म्हणाले. देशातील नागरिकांनी संविधान कलम 19 आणि कलम 15 चा अभ्यास जरी केला तरी त्यांना आपले मूलभूत अधिकार समजण्यास मदत होईल असे खंडागळे यावेळी म्हणाले.यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड़ म्हणाले की गाव विकास समिती मागील काही वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात एक सामाजिक,सांस्कृतिक, वैचारिक व विकासाच्या मुदयावर एक आदर्श निर्माण करत असून व्यवस्थेला सनदशीर मार्गाने आव्हान देत आहे. गेली अनेक वर्ष जे सत्तेत आहेत ते आपल्याला आपले अधिकार समजू देत नाहीत,आपण गाव विकास समितीच्या माध्यमातून एकत्र येऊन एक ताकद निर्माण करु असे गोताड़ यावेळी म्हणाले. माजी प्राचार्य सुरेश जोशी यानी गाव विकास समितीच्या लोकशाही मेळावा या संकल्पनेचे कौतुक करताना या संघटनेने लोकजागृतिचे काम हाती घ्यावे असे आवाहन केले.संविधान घराघरात पोहचले पाहिजे असे सांगताना डॉ जोशी यांनी नागरिकांना संविधानाचे महत्व समजावून सांगितले.या कार्यक्रमला संगमेश्वर मधील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. अध्यक्ष उदय गोताड़ संघटन प्रमुख सुहास खंडागळे,आणि निमंत्रित अतिथी माजी प्राचार्य सुरेश जोशी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 21 महिलांना स्त्रीशक्ति पुरस्कार महिला अध्यक्ष सौ दिक्षा गिते- खंडागळे व अनघा कांगणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सन्मानपत्र व माहेर ची साडी असे या पुरस्काराचे स्वरुप होते.यावेळी गाव विकास समिती संघटनेचे उपाध्यक्ष राहुल यादव,मंगेश धावडे,सरचिटणीस सुनील खंडागळे, सुरेंद्र काब्दुले,जिल्हा संघटक मनोज घुग,जिल्हा अध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, उपाध्यक्ष मुझम्मील काझी,संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रशांत यादव,संगमेश्वर कार्याध्यक्ष अमित गमरे,उपाध्यक्ष प्रशांत घुग,वैभव जुवले, देवरुख शहर अध्यक्ष डॉ मंगेश कांगणे,मुख्य प्रचारक सतेश जाधव,नितीन गोताड, वांझोळे विभाग अध्यक्ष महेश धावडे, विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दैवत पवार, पूजा घुग,सुरज कांबळे,महेंद्र घुग सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*या 21 महिलांना स्त्री शक्ती सन्मान..*
सन्मान करण्यात आलेल्या महिलांमध्ये सौ. राजश्री कुळ्ये यांज बरोबर नंदिनी लोकम, डॉ श्रेया चांदीवडे, प्रतिभा कांबळे, प्रीती परशराम, पल्लवी खापरे, नाझीमा काझी, अंजली झगडे, रोहिणी धावडे, गुणवंती यादव, दिक्षा जाधव, नंदिनी खेडेकर, मनाली खापरे,शीतल शिंदे,शबाना गोलंदाज, संजीवनी मुरुडकर,प्रियांका चव्हाण, माधुरी देसाई, सुलोचना गोवळकर, कल्पना गोवळकर वांझोलेमधील खो खो खेळाडू तेजस्विनी सनगले आणि पल्लवी सनगले यांनाही स्त्रीशक्ति सन्मान देऊन गौरवण्यात आले.
*निबंध स्पर्धेतील विजेते…*
यावेळी गाव विकास समिती आयोजित छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धेचाही निकाल जाहिर करण्यात आला, जिल्हाभरातून आलेल्या निबंधामधून प्रथम क्रमांक-पिरंदवणे येथील श्वेता संतोष गमरे, द्वितीय-क्रमांक योगेश तानू पेढांबकर आणि तृतीय क्रमांक-प्रांजल शशिकांत मोहिते यांना प्रदान करण्यात आली. सारिका मोरे,निधी आखाडे, श्रध्दा हळदणकर, अक्षता देसाई, अक्षता वेले,हर्षदा शेंडगे, आकांक्षा मुळ्ये, सुरज कांबळे, सुशांत वहाळकर, आकाश गोवरे, केदार धुमाळी, साक्षी पंडित, शिल्पा लांजेकर, पिंकी बेन, स्वप्नाली शिर्के, प्रसन्न खानविलकर, संकेत पवार, सौरभ कदम, गायत्री मोहिते, सोनाली गार्डी यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान करण्यात आली.