
रेल्वे प्रशासनाविरूद्धची ओरड चुकीची व गैर कोकण रेल्वे अधिकार्यांचा दावा
कोकण रेल्वेच्या दीड लाख प्रकल्पग्रस्तांमधून पात्र ठरणार्या उमेदवारांना सेवेची संधी देण्यात येते. अनेक उमेदवार रेल्वेच्या सेवेत येवू शकले नाहीत. त्यांचा कामाविषयी आक्षेप होता. म्हणून बेलापूर येथील अधिकारी रत्नागिरीत आले. त्यांनी आठवडाभर चाललेल्या कॅम्पमध्ये सर्व आक्षेपांचे निराकरण केले आहे. सर्व दस्तऐवज आणि पुरावे यांच्या आधारे कोणत्या उमेदवाराला सेवेसाठी नकार देण्यात आला, हे ही खुलासेवार सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या विरूद्धची ओरड चुकीची व गैर आहे, असा खुलासा रेल्वेच्या अधिकार्यांनी केला. रत्नागिरी येथे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे संतोष चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक आक्षेप घेतले होते. त्या संदर्भात रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी खुलासा केला आहे.
www.konkantoday.com