रत्नागिरीत आर्टिस्टी क्लबकडून प्रदर्शनांचे आयोजन
रत्नागिरी येथील आर्टिस्टी क्लबकडून विविध कलात्मक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.या प्रदर्शनात काव्य- राजश्री शिधये, सुलेखन-विपुल पुनसकर, चित्र-श्वेता केळकर, सलिल गोरे, ऋषिकेश मुळ्ये, ओंकार कांबळे, भुषण वेलय, अनुजा कानिटकर, श्रेयस प्रभूदेसाई, बांबू कलाकृती-नितीन लिंगायत, छायाचित्र-निमीष वैद्य, सानिका गोरे, नाणी प्रदर्शन चिन्मय बेर्डे आदींचा सहबाग असणार आहे. हे प्रदर्शन स. ९ ते सायं. ७ या वेळेत कृ. चि. आगाशे विद्यामंदिर, पटवर्धन प्रशाला येथे होणार आहे.
२९ रोजी सायंकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत रत्नागिरीतील ज्येष्ठ कलाकार श्रीकांत ढालकर यांची कला कलाकारीच्या वाटेवर या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. १ डिसेंबर रोज स. १०.३० ते ११.४५ या वेळेत रत्नागिरीतील ज्येष्ठ चित्रकार राजेंद्र मुळ्ये यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
www.konkantoday.com