शिवाजी पार्क येथे शपथविधीची जय्यत तयारी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी ६-४० वाजता शिवाजी पार्क येथील भव्य सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा मुख्यमंत्री होत असल्याने, हा
शपथविधी सोहळा ऐतिहासिक व्हावा यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील जवळपास ४०० शेतकऱ्यांना, राज्यातील तसेच देशातील अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
www.konkantoday.com