
रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ जण कबड्डीची पंच परीक्षा उत्तीर्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या कबड्डी पंच परीक्षेत जिल्ह्यातील २२२ जण पास झाले आहेत. या परीक्षेत दापोलीत संदीप क्षीरसागर यांनी प्रथम, चिपळूणचे युगेश कदम यांनी द्वितीय तर चिपळूणच्याच ललिता घरट यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक असे स्वरूप असलेल्या या परीक्षेसाठी दापोली तालुक्यातून २६, खेडमधून ४३, चिपळूणमधून ३९, संगमेश्वरमधून ३५, रत्नागिरीतून २५, लांजातून २९, राजापुरातून २५ असे एकूण २२२ जण बसले होते. हे सर्वजण यशस्वीरित्या पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील कबड्डीचा पंच परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
www.konkantoday.com