रत्नागिरी शहर परिसरात मोटार सायकल व सायकल चोरी करणारी टोळी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
रत्नागिरी शहरामध्ये सध्या मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी, चोरीचे प्रमाण वाढल्याने या प्रकारांना प्रतिबंध होणेकरीता व सदरचे गुन्हे उघडकीस येणेकरीता मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके तयार करुन त्यांना साध्या वेषामध्ये गस्त ठेवणेबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे रत्नागिरी शहर परिसरामध्ये सलग तीन ते चार दिवस तपास पथकाचे गस्त घालण्याचे काम सुरु होते. दिनंाक 26/11/2019 रोजी गस्ती दरम्याने रत्नागिरी शहरातील नाचणे रोडवर दोन संशयास्पद मोटारसायकल व चार इसम आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून, त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी रत्नागिरी शहर परिसरामध्ये अनेक मोटार सायकल व सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सदर इसम 1) यश राजकुमार शर्मा, वय-19 वर्षे, रा. घुडेवठार, रत्नागिरी, 2) सुरज सुरेश सकपाळ, वय-19 वर्षे, रा. तेली आळी, रत्नागिरी 3) विघ्नेश देंवेद्र भाटकर, वय-19 वर्षे, रा. तोणदे, भंडारवाडी, रत्नागिरी व विधीसंघर्षित बालक अशा एकूण चार जणांच्या ताब्यातुन 03 हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल, 01 पल्सर मोटार सायकल, 01 अपाची मोटार सायकल, 01 बजाज कंपनीची सीटी 100 मोटार सायकल, 02 सायकल तसेच 02 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 1,10,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. वर नमूद इसमांनी चोरुन नेलेल्या मोटार सायकलबाबत खात्री केली असता, सदरबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे मोटार सायकल चोरीचे 04 गुन्हे दाखल आहेत. सदर इसमांना पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, पोउनि श्री. विकास चव्हाण,सहा.पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, पांडुरंग गोरे, पोहेकॉ प्रशांत बोरकर,संदीप कोळंबेकर, संजय कांबळे, शांताराम झोरे, राकेश बागुल, सुभाष भागणे, मिलींद कदम,संजय जाधव, पोना अमोल भोसले, उत्तम सासवे, अरुण चाळके, गुरुनाथ महाडीक, विजय आंबेकर,नितीन डोमणे,अरुण चाळके, सागर साळवी,रमिझ शेख, पोकॉ/दत्तात्रय कांबळे यांनी केलेली आहे.
www.konkantoday.com