कोकणात पर्यटनात वाढ व्हावी या उद्देशाने नागपूरमध्ये कोकण पर्यटन परिषदेचे आयोजन
कोकणात पर्यटकांची वाढ होऊन येथील पर्यटन उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एका संस्थेच्या मदतीने नागपूर येथे ७ व ८ डिसेंबर २०१९ रोजी कोकण पर्यटन परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत नागपूर येथील पर्यटन व्यावसायिकांना कोकणातील पर्यटन स्थळे कोकणातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, वाहन सेवा, टूर ऑपरेटर, निवास न्याहारी, महाभ्रमण, जलक्रीडा, स्कुबा डाविंग व साहसी क्रिडा यांची माहिती दिली जाईल. या कार्यशाळेमुळे कोकणातील व्यावसायाला व इतर खाजगी उद्योजकांना लाभ व कोकणात जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करणे शक्य होईल.
कोकण विविध निसर्गसौंदर्य व वैविध्यपूर्ण समृद्ध आहे. समुद्रकिनारे, जलदुर्ग, इतिहासकालीन गड, किल्ले, मंदिरे, कातळशिल्पांसह कोकण निसर्गासौंदर्याने समृद्ध आहे. कोकणातील खाद्यपदार्थ उदा. उकडीचे मोदक, सोलकढी, कोंबडी वडे इ. खाद्यपदार्थ देखील पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करतात.
www.konkantoday.com