
अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत यांची भारतीय संघात निवड
काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या दोन खेळाडू अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत यांची भारतीय खो खो संघात निवड झाली आहे.दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 1 ते 5 डिसेंबर 2019 या कालावधीत काठमांडू येथे होत आहेत.
दिल्ली येथे आज भारतीय खो खो संघाची निवड झाली. या भारतीय संघात रत्नागिरीच्या 2 खेळाडूंनी स्थान पटकावले आहे.
रत्नागिरीच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या 2 खेळाडूंची प्रथमच स्थान मिळवले आहे.ऐश्वर्या सावंतची ही दुसरी अंतरराष्टीय स्पर्धा आहे. 2 वर्षांपूर्वी झालेल्या आशियायी खो खो स्पर्धेत तिचा भारतीय संघात सामवेश झाला होता. छत्रपती पुरस्कारप्राप्त ऐश्वर्याला भारतातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा राणी लक्ष्मी पुरस्कार मिळाला होता तर अपेक्षाला भारतातील सर्वोत्कृष्ट जुनीयर महिला खेळाडूचा जानकी पुरस्कार मिळाला आहे.
www.konkantoday.com