राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणुन उद्धव ठाकरे शपथ घेणार तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे जयंत पाटील उपमुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार कोसळले आहे. भाजप सत्तेच्या मैदानातून बाहेर गेले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे शपथ घेतील तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे शपथ घेतील असे महाविकास आघाडीने ठरविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे उद्याच्या उद्या सत्ता स्थापनेचा महाविकास आघाडी दावा केला जाणार आहे तसेच उद्या विश्वासदर्शक ठराव देखील मंजूर करून मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल त्यामुळे राज्यातशिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे .
www.konkantoday.com