रत्नागिरी नगर परिषदेची सीएनजी गॅस कंपनीला नोटीस
सध्या रत्नागिरी शहरात सीएनजी गॅस कंपनीतर्फे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे त्यासाठी शहरातील विविध भागात रस्त्याचे खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे हे करीत असतानाइतर पाईपलाईन फुटण्याचे वारंवार प्रकार घडत आहेत रत्नागिरी नगरपरिषदेच्या अभियंत्यांकडून लाईन आऊट न करताच कंपनीने खोदकाम सुरू केले आहे याची दखल रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासनाने घेऊन कंपनीला नोटीस बजावली आहे व तात्काळ खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे .
www.konkantoday.com