रत्नागिरीतील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सरोज सावंत यांनी पटकावली २ रौप्यपदके
बेंगलोर येथे ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या सनराईज ऑल इंडिया मास्टर रँकींग बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सरोज सावंत यांनी महिला एकेरी व दुहेरी या दोन्ही प्रकारात रौप्यपदकांची कमाई केली.
एकेरी गटात त्यांनी कर्नाटकच्या मंजिरी मोकलानी यांचा सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मध्यप्रदेशच्या प्रथम सिडेड खेळाडू शालिनी यादव यांना कडवी लढत दिली. ३ सेट चाललेल्या या सामन्यात त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. १ डिसेंबरपासून सुरू होणार्या दुसर्या सत्रातील राष्ट्रीय स्पर्धा नागपूर येथे होत आहेत. त्या करिता सर्व बॅडमिंटनपटूंकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
www.konkantoday.com