खेड नगर परिषद उभारणार जनावरांच्या बंदोबस्तासाठी कोंडवाडा
खेड शहरात सुरू असलेल्या मोकाट जनावरांच्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर श्वानांच्या नसबंदीपाठोपाठ आता मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कोंडवाडा उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली. जनावरांच्या मालकांवरही कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पादचार्यांसह व्यापार्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
www.konkantoday.com