
पंढरपूरचा विठुराया देखील आता बुलेटप्रूफ काचेच्या संरक्षणात
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. ही कामे करत असताना विठ्ठलाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा धोकानिर्माण होऊ नये, यासाठी रविवारी मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले.विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, चांदी काढण्यात येणार आहे. ग्रॅनाईट काढताना त्याचे तुकडे मुर्तीवर उडू नये, मुर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे. काळा पाशाण स्वच्छ करण्यासाठी स्टॅन्ड बाल्टींग करण्यात येणार आहे. यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले आहे.पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी होते. रांगेत न जाता अनेकजण विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन येतात. पण आता मुखदर्शन वेळेत बदल करण्यात आला आला आहे. 15 मार्च शुक्रवारपासून विठ्ठलाचे दिवसातून 5 तास मुखदर्शन चालू राहील, इतरवेळी मुखदर्शन घेता येणार नाही.www.konkantoday.com