शासनाने लाकूड वापराचे नियम शिथिल करावेत जिल्हा सॉ मिल संघटनेेचे नुतन अध्यक्ष बाळकृष्ण ओक यांची मागणी
शेतकर्यांसाठी उपयोगात येणार्या लाकूड वापराबाबत शासनाकडून लागू असलेल्या अटी व नियम शिथिल करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा सॉ मिल संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण ओक यांनी दिली. अध्यक्षपदी निवड झाल्यावर ते बोलत होते. बाळकृष्ण ओक म्हणाले, जिल्ह्यातील सर्व सॉ मिल चालकांच्या शासन दरबारी असणार्या मागण्यांकरिता पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्यात शेकर्यांना वृक्षलागवडीकरिता मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष शेतकरी व व्यापार्यांपर्यंत पोहोचवल्या जातील. जिल्हा सॉ मिल संघटनेच्या जिल्ह्यात एकूण १८६ सॉ मिल चालक सभासद आहेत सॉ मिल चालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. शासन दरबारी या मागण्यांचा नियमितपणे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com