रत्नागिरी (जिल्हा) वाचनालयात जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयामध्ये 1 लाख ग्रंथसंपदा आहे. वाचकांना वाचनालयाच्या ग्रंथसंपदेचा आस्वाद घेता यावा ही ग्रंथसंपदा हाताळता यावी यासाठी वाचनालयाचे सर्व जुनी ग्रंथसंपदा प्रदर्शनाच्या रूपाने वाचकांसाठी खुली करून दिली आहे.
मंगळवार दि.19नोव्हेंबर सायकाळ पासून 30 नोव्हेंबर वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर सभागृहा मध्ये हे ग्रंथप्रदर्शन मांडण्यात आले आहे.
वाचनाल्यामध्ये 1800 शतकापासून जी जुनी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ गाजलेली पुस्तके या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रंथप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे. 1 लाख पेक्षा जास्त ग्रंथसंपदा असलेल्या या वाचनालयाचे सर्व ग्रंथ , पुस्तके यांचे प्रदर्शन मांडल्यामुळे अनेक अनमोल ग्रंथ हे वाचकांपर्यंत पोचतील व प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक भेटेल.
वाचकांनी पुस्तके पाहून त्या पुस्तकांचे दाखलक्रमांक आपल्या जवळ टिपून ठेवले तर पुढे अनेक महिने या जुन्या ग्रंथसंपदेचे रसग्रहण वाचकांना करता येईल.
मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर सायं.5.00 पासून 30 नोव्हेंबर पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून हे पुस्तक प्रदर्शन सकाळी 8.30 ते 12 व 3.30 ते 7.00* या वेळेत सर्व वाचकांसाठी खुले रहाणार आहे.
सर्व ग्रंथप्रेमी नागरिक, प्रामुख्याने युवावर्ग यांनी ग्रंथांचे प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जुन वाचनालयाला भेट द्यावी असे आवाहन वाचनालयाचे मा. अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button