
वाढीव वीजबिलांमुळे सूक्ष्म, लघु उद्योज वाढीव वीजबिलांमुळे सूक्ष्म, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांसह व्यापारी अडचणीत.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २५ जून रोजी दिलेल्या पुनरावलोकन आदेशाबाबत अ. भा. अक्षय ऊर्जा संघटना रत्नागिरी जिल्ह्यातील लहान-मोठ्या उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या आदेशामुळे वीज दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे हॉटेल उद्योग, रुग्णालये, सूक्ष्म, लघु उद्योग, उत्पादन कारखाने यांना मोठा धोका पोहोचणार आहे. त्यामुळे हा आदेश मागे घेण्याकरिता जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांतर्फे मागणी करण्यात आली आहेअ. भा. अक्षय ऊर्जा संघटना जिल्हा शाखा, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, उत्तर रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशन, चिपळूण, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशन एकत्र येणार आहेत.आयोगाच्या पुनरावलोकन आदेशामुळे विविध प्रकारचे उद्योग बंद होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक कमी होऊ शकते, अक्षय ऊर्जा क्षेत्राला फटका बसू शकतो आणि महाराष्ट्रातील व्यवसायाचे वातावरण बिघडू शकतेआयोगाने २५ जून २०२५ चा आदेश तात्काळ रद्द करावा. २८ मार्च २०२५ चा आदेश पुन्हा लागू करावा. आयोगाने सार्वजनिक व औद्योगिक प्रतिनिधींची नियुक्ती करावी. सौर बँकिंग आणि नेट मीटरिंग पुन्हा लागू करावेत. ओपन अॅक्सेस मंजुरीची प्रक्रिया सुलभ करावी अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.नवीन दरपत्रकामुळे वीजदर १० टक्क्यांनी कमी होतील. मात्र, प्रत्यक्षात भरमसाठ वाढणार आहेत. जुलै २०२५ ची वीजबिले मार्च २०२५ च्या तुलनेत लक्षणीय वाढ दाखवतात. हे निर्णय कोणत्याही सार्वजनिक सल्लामसलतीशिवाय एकतर्फीपणे घेतले गेले आहेत. याला संघटनेचा विरोध आहे.