कर्नाटक महामंडळाच्या एसटी बसवरील मराठी फलक अस्पष्ट, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची तक्रार

रत्नागिरी ते कर्नाटक राज्यात जाणार्‍या कर्नाटक महामंडळाच्या गाड्यांचे फलक मराठीत स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेक प्रवाशांचा गोंधळ उडतो. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या रत्नागिरी तालुका शाखेतर्फे एस.टी. महामंडळाकडे करण्यात आली आहे. हे निवेदन कक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख महेश पत्की, सुनिल शिवलकर, निलेश बेर्डे यांनी दिले. यावेळी अधिकार्‍यांबरोबर चर्चाही केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button