
सैन्य भरती प्रक्रिया पारदर्शक पणे पार पडणार- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर दिनांक १७ ते २७ नोव्हेंबर पर्यंत रत्नागिरी येथे होणारी सैन्य भरती प्रकिया शंभर टक्के पारदर्शक पणे पार पडणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, कर्नल अणुराग सक्सेना आदी अधिकारी उपस्थित होते.कर्नल अनुराग सक्सेना यांनी रत्नागिरी येथील सैन्यभरती प्रक्रिया कडक नियमांनुसार व काटेकोरपणे पार पडणार असल्याचे सांगीतले .तसेच येथे बोगस पणा वशिलेबाजी चालणार नाही असा ईशारा ही कर्नल अनुराग सक्सेना यांनी दिला आहेसैन्यभरती च्या नावावर जर कोणी तरुणांना फसवण्याचे उद्योग करीत असतील तर त्यांनी सावध राहावे असे आव्हान कर्नल अनुराग सक्सेना यांनी केले आहेरत्नागिरी येथील भरती प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे कर्णल अनुराग सेक्सेना यांनी सांगीतले .विविध जिल्ह्यातील सुमारे सत्तर हजार उमेदवार भरतीसाठी येणार आहेत.
www.konkantoday.com