महाराष्ट्रवैभव ग्राहक पेठेच्या प्रदर्शनाचा मुंबईत शुभारंभ ! मराठी उद्योजकांचे प्रदर्शन

कोकण उद्योजक प्रतिष्ठान व महाराष्ट्रवैभव फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्रवैभव ग्राहक पेठ आयोजित करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत , अण्टोनिया हायस्कूल मैदान, रानडे रोड, दादर पश्चिम येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर, पश्चिम महाराष्ट्र, कोकण संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 100 लघुउद्योजक या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. कोकणातील आंबा-काजू, करवंद पासून बनवलेले खाद्यपदार्थ, पश्चिम घाटातील जांभूळ मध , कोल्हापूर मधील मसाले, चटण्या , नाशिक मधील मनुका, बेदाणे, चिवडा, औरंगाबाद मधील हस्तकला, हँडमेड गारमेंट्स अशी विविध उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी व्यवसायिक, महिला बचत गट, महिला उद्योजक या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करीत आहेत. मराठी व्यवसायिकांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम आहे. याशिवाय देशभरात उत्तम उत्पादने या ग्राहक पेठेत उपलब्ध केली आहेत. जयपूरचे पाचू आणि माणिक, हैदराबाद मधील गोड्या पाण्यातील उत्पादित मोती, जेम्स अँड ज्वेलरी याचाही समावेश या प्रदर्शनात आहे. याशिवाय नेहमी उपयुक्त घरगुती उपकरणे , किचन वेअर, फर्निचर, हेल्थ प्रॉडक्ट अशी अशी सर्व प्रकारची खरेदी दादर मध्ये एकाच छताखाली मराठी व्यावसायिकांकडून करता येईल. मराठी व्यवसायिक चळवळीला गती देणाऱ्या प्रदर्शनाला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी.
महाराष्ट्र मध्ये ग्रामीण भागात खूप तरुण उद्योजक, महिला उद्योजक, संस्था ग्रामीण उद्योग निर्मितीमध्ये महत्वाचे कार्य करत आहेत. अशा उद्योजकांना मुंबईसारख्या शहरात , देशाच्या आर्थिक राजधानीत व्यासपीठ मिळावे त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, प्रसिद्धी व्हावी या दृष्टिकोनातून श्री ग्राहक पेठ आयोजित केली आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या या उद्योजकांचे भविष्यात ब्रँड विकसित व्हावेत यादृष्टीने संघटित प्रयत्न महाराष्ट्र वैभव फाउंडेशन यापुढच्या काळात करणार आहे.
मराठी तरुणांना उद्योजक बनण्यासाठी सतत व्यवसायिक चळवळ चालवणारे महाराष्ट्र वैभव फाऊंडेशनचे अध्यक्ष अनंत भालेकर व ग्लोबल कोकणचे प्रमुख संजय यादवराव हे या उपक्रमाचे आयोजक आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button