वातावरण बदलामुळे काजू उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार?
ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी, क्यार वादळ आणि ऑक्टोबर अखेरपर्यंतच्या मुसळधार पावसाचा प्रतिकूल परिणाम काजूपिकावर झाला आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांनी राज्यातील काजूबागा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम काजू हंगामावर होणार असून किमान ३० टक्के उत्पादन घटून सुमारे १५०० कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोकणातील चार जिल्हे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यात प्रामुख्याने काजू उत्पादन घेतले जाते.
www.konkantoday.com