मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूममधील ९२ हजार रूपये किंमतीच्या तब्बल २४ इन्र्व्हरटर बॅटऱ्या चोरी प्रकरणी तीन जणांना अटक

गुहागर तालुक्यातील आरे श्रीधारदेवी मंदिराजवळील असलेल्या मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूममधील ९२ हजार रूपये किंमतीच्या तब्बल २४ इन्र्व्हरटर वेंटच्या चोरीचा प्रकार पडला होता. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. गुहागर पोलिस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री ११ वाजता याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या दरम्याने तालुक्यातील आरे गावातील श्रीधारदवि मंदिरानजीक असलेल्या की आय, जीओ आणि बीएसएनएल टॉवरचे शेल्टर रूममध्ये असलेल्या टॉवर व्हिजन इंडीया प्रा. लि. पूर्ण कंपनीकडून आलेल्या आमरराजा कंपनीच्या एकूण २४ इन्र्व्हरटर बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात इसमाने शेल्टर रूमचा दरवाजा हत्याराने उचकटुन काढून चोरून नेल्या. सदर बॅटऱ्यांची ९२ हजार किंमत असून चोरी प्रकरणी गुहागर पोलिसांनी तीन संशयिताना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button