
मंगळसूत्र चोरी प्रकरणी दोन जणांना अटक
कोतवडे येथील राहणाऱया प्रतिभा शिवलकर या महिलेला सुरीचा धाखवत तिच्या गळय़ातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरल्याप्रकरणी पोलिसांनी मुंबई येथील नामांकित गुंड राजेश गुरव यांच्यासह स्थानिक आरोपी राम शिवलकर याला अटक केली आहे आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली .
www.konkantoday.com