
चाेरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी चर खाेदले
चिपळूण तालुक्यात हातपाटी वाळू उत्खननास बंदी आहे. तरीही काही ठिकाणी बेकायदा वाळू उत्खनन सुरू आहे. चोरट्या वाळू उत्खननास पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाने रस्त्यातच चर खोदाई करून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू उत्खनन करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरालगतच्या दाभोळ खाडीत ड्रेझरने वाळू उत्खननास परवानगी आहे. हातपाटीला वाळू उत्खनन करण्यात महसूल विभागाने परवानी दिलेली नाही. तरीही काही दिवसांपासून दाभोळ खाडीत बेकायदा हातपाटीचे वाळू उत्खनन सुरू होते.
www.konkantoday.com