पितांबरी उद्योग समूहाच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागात अनेकांना रोजगार
पितांबरी उद्योग समुहाच्या तळवडे येथील गुर्हाळाचा या वर्षीच्या हंगामाचा शुभारंभ झाला. कोकणात दुर्मिळ दिसणारे ऊसाचे पिक या उद्योग समुहासाठी जवळजवळ अनेक गावातील ५० पेक्षा अधिक शेतकरी घेतात. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभूदेसाई यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा या हेतूने २०१७ पासून तळवडे येथे केमिकल फ्री गुळ पावडरची निर्मिती अत्यंत स्वच्छ वातावरणात केली जाते. अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानासह येथे उत्पादन केले जाते. दरदिवशी जवळपास २० टन ऊस गाळप आणि दोन टन गुळाच्या पावडरची निर्मिती आणि पॅकींग करून महाराष्ट्र आणि इतर राज्यात वितरित केली जाते.
www.konkantoday.com