वेळणेश्वर येथे वृद्धांसाठी साथ-साथ चॅरिटेबलचा प्रकल्प
साथ-साथ चॅरिटेबलने गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे विवेकानंदालय हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल अडीच हजार क्षेत्रात प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त शरद जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
समाजातील दुर्बल, मागास, वंचित घटकांसाठी ग्रामविकासाचा विवेकानंदालय हा प्रकल्प वेळणेश्वर येथे उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये मंदिर, वाचनालय, रूग्णालयासह स्वतंत्र खोल्या बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी येथील जोशी कुटुंबियांनी अडीच एकर जागा दिली आहे. शहरात राहणार्या वृद्धांना घरात राहणे कंटाळवाणे होवून कधी कधी असुरक्षित वाटते. उतारवयात समवयस्क व्यक्तींसोबत राहिल्याने जगण्याचा आनंद घेता येतो. त्यासाठीच रिटायर्ड बट नॉट टायर्ड लोकांसाठी चॅरिटेबल ट्रस्टने ही संधी उपलब्ध केल्याचे जोशी यांनी सांगितले. या प्रकल्पात वाचन, लेखन, गायन, योगासने, खेळ, प्रार्थना, ध्यानधारणा, बागकाम करण्याची संधी लाभणार आहे.
www.konkantoday.com