
मच्छिमारांना भरपाईसाठी समिती गठीत करणार
राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मासेमारांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपदग्रस्त झालेल्या मच्छिमारांना २१०० कोटी रुपये सानुग्रह मदत द्यावी, अशी मागणी कोळी महासंघाच्यावतीने करण्यात आली. यावेळी राज्यस्तरावर समिती गठीत करणार असल्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घोषित केला.
कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. राज्यात २८ हजार मासेमारी नौका असून २० हजार मच्छिमार नौका बंदरावरच परत आल्या. यामुळे मासेमारीवर झालेला खर्च, डिझेल, बर्फ, खलाशी या यंत्रणेवर अवलंबून असणार्या कष्टकरी समाजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
www.konkantoday.com