अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली : अयोध्या विवादात्मक जागेवर अखेर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. विवादात्मक जागा ही राम मंदिरासाठी देण्यात आली असून, मशीदीसाठी अयोध्येतच पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्य़ात आले आहेत.
राम मंदिर बांधण्यासाठी 3 महिन्यात रुपरेखा तयार करण्याचे कोर्टाचे आदेश.
*सुप्रीम कोर्टाचा निर्णय!*
> वादग्रस्त जागा रामलल्लाची, >मुस्लिमांना अयोध्येत 5 एकर पर्यायी जागा मिळणार आहे.
>ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत.
>सुन्नी वक्फ बोर्डाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत करण्यात आले आहेत.