रिक्षाच्या भाड्यावरून वाद रिक्षाचालकाला नेपाळी तीन तरुणांकडून मारहाण
रिक्षांच्या भाड्यावरून वाद घालत रिक्षाचालकाला मारहाण करणाऱ्या तिघा नेपाळी तरुणांविरुद्ध पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना बुधवारी (ता. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास साळवीस्टॉप येथे घडली. अमीत उदय रणसे (वय २८, रा. शांतीनगर-रसाळवाडी) हे रिक्षाचालक व प्रवासी साक्षीदार रमेश खेत्री हे बसस्थानकावरून शह र रिक्षाने टीआरपी साई एजन्सी येथे जात होते. रिक्षा साळवीस्टॉप येथे आली. त्यावेळी तीन नेपाळी उभे होते. त्यांनी रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी भाडे विचारले त्यावेळी रिक्षा चालकाने प्रत्येकी तीस रुपये द्या असे सांगितले. रात्रीचे अकरा वाजल्याने दीडपट भाडे आहे. यावरून वादावादी व झटापट झाली तिघांनी फिर्यादी याला मारहाण केली. पोलिसांनी तीन नेपाळ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com