जिल्ह्यातील छोट्या वयोगटातील मुलांसाठी जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र (डिस्ट्रीक्ट अर्ली इंटरव्हेशन सेंटर) सुरु
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात छोट्या वयोगटातील मुलांसाठी शिरस्ता शेप केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्राचा रत्नागिरी जिल्ह्यातील 0 ते 8 वयोगटातील मुलामुलींना फायदा होणार आहे.बाळ जन्मल्यानंतर ते पहिले पाच वर्ष हा कालावधी बाळाच्या वाढ आणि विकासाच्या दृष्टीकोनातून फार महत्वाचा असतो. याच कालावधीत विकासात विसंगती अडथळा किंवा समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम बाळाच्या भविष्यातील वाढ आणि विकासावर होवू शकतो. पुढे बाळामध्ये विविध समस्या उद्भवू शकतात. या समस्या म्हणजे वयानुरुप वाढ आणि विकास न होणे, विकासाचे टप्पे उशिराने पूर्ण होणे, अशी मुले सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडी वेगळी असतात. या मुलामुलींमध्ये काही अक्षमता पहावयास मिळतात जसे कुशीवर येता न येणे, बसता न येणे, शारिरीक समतोल साधता न येणे, उभे राहता न येणे, चालता न येणे, वस्तू हातात पकडता न येणे, बोलता न येणे, उशिराने बोलणे, अडखळत बोलणे, ऐकायला न येणे, कमी ऐकायला येणे, डोळ्याने न दिसणे अथवा कमी दिसणे, आकडी येणे, आपली स्वत:ची दैनंदिन जीवनातील कामे करता न येणे, एका ठिकाणी शांत न बसणे, स्वत:मध्ये मग्न असणे, सांगितलेले लक्षात न राहणे, अभ्यासात कमी असणे, एकटे राहणे अशा समस्या निर्माण होतात.या सर्व समस्यांचे निदान व उपचार बालरोग तज्ञ, दंत चिकित्सक, फिजीओथेरिपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपीस्ट, ऑडीओलॉजीस्ट व स्पीच थेरिपीस्ट, क्लिनीकल सायकोलॉजिस्ट, सोशल वर्कर, स्पेशल एज्युकेटर, स्टाफ नर्स इत्यादी तज्ञांच्या मार्फत करण्यात येणार आहे. ज्या मुलामुलींना शस्त्रक्रियांची आवश्यकता असणार आहे. त्याकरीता राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रमातंर्गत नामांकित व प्रतिथयश शासकीय व अशासकीय रुग्णालयातून विविध शस्त्रक्रिया सेवा देण्यात येत आहे.
www.konkantoday.com