
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काही वेळापूर्वीच मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.मागील काही दिवसांपासून देवरा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यातच त्यांनी केलेल्या ट्वीटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे देवरांच्या 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
www.konkantoday.com