
आमच्या घराण्याने कधीही खोटे बोललेले नाही आणि ती आमची परंपराही नाही –उद्धवजी ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचा समाचार उद्धवजी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतला
समसमान वाटपाचे ठरलेले नव्हते असे मुख्यमंत्री सांगत आहेत परंतु ते खोटे बोलत आहेत . मातोश्रीवर आलेल्या अमित शहा व आपली चर्चा झाली होती त्या वेळी पद आणि जबाबदारी यांच्यात समसमान वाटप होईल असे अमित शहांनी कबूल केले होते यामुळे मुख्यमंत्री हे पद असल्याने असल्यामुळे त्याच्यातही समान वाटप आवश्यक आहे.
देवेंद्रजी फडणीस माझे मित्र आहेत त्यांचेकडून अपेक्षा नव्हती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे ठरले नव्हते म्हणताहे ते मला खोटे ठरवत आहेत . शिवसेनाप्रमुखांचा मुलगा कधीही खोटं बोलणार नाही शिवसेनेची खोटं बोलण्याची परंपरा नाही.ती परंपरा कुणाचे आहे हे जनतेला माहित आहे . मोदीजींवर आम्ही कोणती टीका केली नाही या उलट मोदी जीनी मला लहान भावाचा दर्जा दिला होता त्यामुळे कोणाच्या पोटात दुखले असेलच मला माहिती नाही युतीमध्ये कोण काडी घालत याचा शोध मोदीजीनी यांनी घ्यावा . भाजपला मी शत्रू मानत नाही परंतु त्यांनी खोटं बोलू नये . शब्द देऊन फिरवण्याची आमची वृत्ती नाही खरे कोण खोटे कोण महाराष्ट्राला जनतेला माहित आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याचे काम त्यांनी थांबवावे .मला धक्का बसला की बहुमत नसतानाही काळजीवाहू मुख्यमंत्री आमचे सरकार येणार म्हणत आहेत तुम्ही सत्तास्थापनेचा विचार करू शकता मी विचार केला तर चुकीचे काम कसे ठरते.मी मुख्यमंत्र्यांशी बोललो नाही हे खरे आहे मला वेळ होता परंतु मी मुद्दाम बोललाे नाही कारण मी खोटे बोलणाऱ्या माणसांशी बोलणार नाही.जो पर्यंत तुम्हीआपण स्वतः खोटं बोललाे हे मान्य करीत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही
त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचा दावा करावा. झालेल्या चुकांची त्यांनी लवकरात लवकर सुधाराव्यात असाही सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला . मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर कुणावरही विश्वास नाही नाणार उल्लेख करून उल्लेख करून म्हणाले मुख्यमंत्र्यांनी रद्द केले सांगितले होते आणि नंतर परत शब्द बदलला
त्यामुळे खोटे कोण बोलत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबावर जेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास अमित शहा आणि कंपनीवर नाही असेही त्यांनी सांगितले
मी चर्चेची दारे बंद केली नाही खोटेपणाचा आरोप केला म्हणून आम्ही चर्चा बंद केली होती खोटेपणा त्यांनी मान्य करावा .असेही त्यांनी सांगितले .
www.konkantoday.com