पर्यटकांची सुरक्षितता टांगणीवर वॉचटॉवरची झाली दुरावस्था
गणपतीपुळे परिसरात समुद्रात पर्यटक बुडण्याचे प्रकार घडत असतानाच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेला वॉच टॉवर अखेरची घटका मोजत आहे. या टॉवरची दुरावस्था झाली असून तो केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे येथील जीवरक्षकांना अन्य टॉवरचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
गणपतीपुळे ग्रामपंचायतीने शासनाच्या पर्यटन निधीतून समुद्रकिनारी सुमारे तीन वर्षापूर्वी दोन वॉच टॉवर उभारले होते. या वॉच टॉवरद्वारे गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांकडून समुद्र स्नानासाठी उतरणार्या पर्यटकांवर नजर ठेवण्याचे काम केले जाते. परंतु यंदाच्या पावसाळ्यात गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सुलभ इमारतीसमोर उभारलेला वॉच टॉवर मोडकळीस आला आहे.
www.konkantoday.com