
दिव्यांगांसाठी क्रिकेट निवड चाचणी
दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी व प्रहार अपंग क्रांती आंदोलन रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने १० नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता दापोलीतील आझाद मैदानावर दिव्यांग महिला व पुरूष खेळाडू यांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट निवड चाचणी घेण्यात येणार आहे. खेळाडूंनी येताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, पासपोर्टसाईज दोन फोटो घेऊन येणे. निवड झालेल्या खेळाडूंचा महिला व पुरूष संघ, ३ डिसेंबरला पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रशांत सावंत, सुरेश जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com