सर्वसमावेशक समिती स्थापन करून मतदारसंघाचा विकास साधणार-आ.शेखर निकम
चिपळूण संगमेश्वर मतदार संघात राजकीय व्यक्ती,बिगर राजकीय व्यक्ती, युवक,महिला,ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात माला मताधिक्य दिले आहे.जनतेचा विश्वास जपून या सर्व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आपण करू .त्याचप्रमाणे विशिष्ट पद्धतीची रचना करून सर्वसमावेशक एक समिती स्थापन आपण करणार असल्याचे प्रतिपादन चिपळुन संगमेश्वर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शेखर निकम यांनी सांगितले.यावेळी बोलताना ते म्हणाले मतदारसंघात अनेक समस्या आहेत त्या मार्गी लावण्याचे काम आपण करणार आहोत.मतदारसंघात १४ ते १५ पाझर तलाव बांधून पाण्याचा प्रश्न सोडवु.चिपळूण शहरामध्ये इंडोअर स्टेडियम उभारणे,शहरांमध्ये ग्रॅविटी नळ पाणी योजना राबवणे,मार्गदर्शन केंद्र उभारणे सारखे अनेक कामे आपण करणार आहोत.चिपळुन नगरपालिकेला विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचे ते म्हणाले.देवरुख ग्रामीण रुग्णालयात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे.औद्योगिक वसाहतींमध्ये छोटे मोठे उद्योग उभे करण्यासाठी प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती करणे असे आपले उद्दिष्ट असल्याचे त्याने सांगितले.मुंबई गोवा महामार्गावर कारपेटिंग व खड्डे बुजवण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.अवेळी पडलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे भातशेती बरोबरीनेच कडधान्य, आंबा, काजू तसेच अन्य पिकांचेही नुकसान झाले आहे.त्यांना देखील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही त्यांनी केली.
www.konkantoday.com