वाटद एमआयडीसीला स्थगिती नाहीच- जिल्हाधिकार्यांची माहिती
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे औद्योगिक विकास (एमआयडीसी) प्रकल्प उभारण्यासाठी ९९८ हेक्टर जागेच्या भूसंपादनाची अधिसूचना काढली आहे. जमीन मालकांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाला शासनाकडून कोणत्याही प्रकारचे स्थगिती आदेश नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
सोमवारी लोकशाही दिनानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील वाटद, मिरवणे, आगरनरळ या परिसरातील सुमारे ७०० हेक्टर जमिनीवर एमआयडीसी उभारण्यासाठी उद्योग विभागाची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार वाटद औद्योगिक वसाहतीसाठी वाटद, मिरवणे, कळझोंडी, कोळीसरे व गडनरळ या भागातील ९९७ हेक्टर खाजगी तसेच कोळीसरे, कळझोंडी येथील ०.०९० हेक्टर सरकारी क्षेत्रात औद्योगिक विकासासाठी जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com